Sister Kills Elder Brother: छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 14 वर्षाच्या बहिणीने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. मोबाईल फोनवर मुलांशी बोलल्याबद्दल भावाने बहिणीला शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात बहिणीने भावाची हत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिस ठाण्यात दिली आहे. (हेही वाचा- पंजाब गुरुद्वारामध्ये ग्रंथ साहिबचा अनादर केल्याच्या आरोपावरून जमावाकडून 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण)
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील खैरागड चुईखदान- गंडई जिल्हात ही घटना घडली. शुक्रवारी चुईखदन पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती मिळली होती. दोघे ही अमलीदिहकला गावातील रहिवासी आहेत. घटनेच्या वेळीस मुलगी आणि तिचा भाऊ घरी होते आणि इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. मुलीने मोबाईल फोनवर मुलांशी बोलायला घेतले त्यानंतर बराच वेळने तीच्या भावाने या गोष्टींवर फटकारले
तीला फोन वापरण्यास मनाई केली, तीला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरत मुलीने वेळ साधून भावावर हल्ला केला. झोपेत भावावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात त्याला दुखापत झाली. गंभीर जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला. शेजारच्यांना कळण्याच्या आधी मुलीने अंघोळ वैगेर आपटून रक्ताचे डाग मिटवले.
त्यानंतर तीने शेजारच्यांनी भावासंदर्भात विचारणा केली. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह आणि कुऱ्हाड ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीची चौकशी केली आणि सर्व घटना समोर आली. मुलीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.