19-year-old beaten by mob (PC - X/@Gagan4344)

Punjab Shocker: फिरोजपूर (Ferozepur) मध्ये शनिवारी श्रीगुरू ग्रंथ साहिब (Sriguru Granth Sahib) चा अनादर केल्याच्या आरोपावरून जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना फिरोजपूरमधील मल्लनवाला शहराजवळील बंदाला गावात असलेल्या श्री बाबा दीप सिंग गुरुद्वारा साहिबमध्ये शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. 25 वर्षीय बक्षीश सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाने जाणूनबुजून श्री गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानाची घटना घडवून आणल्याचा आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार, गावाजवळ राहणारा एक तरुण आधी गुरुद्वारात आला आणि त्याने डोके टेकवले. नंतर त्याने श्री गुरु ग्रंथ साहिबची पाने फाडून फेकून दिली. पोलिसांनी सांगितले की, गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये एका तरुणाने श्री गुरु ग्रंथ साहिबच्या पवित्र स्वरूपाचे काही भाग फाडल्याची माहिती मिळताच तेथे गर्दी जमली. (हेही वाचा - Agra Teachers Fight Video: शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, आग्रातील घटना)

पहा व्हिडिओ - 

जमावाने तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. (वाचा -Woman Ties Her Husband With Iron Chain: संपत्तीच्या वादातून महिलेची पतीला घरात साखळीने बांधून 3 दिवस मारहाण; तेलंगणातील घटना, पहा व्हिडिओ)

यापूर्वीही अशा घटना घडल्या -

पंजाबमध्ये याआधीही धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी अमृतसरमध्ये अपवित्राच्या आरोपावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. 19 डिसेंबर 2021 रोजी, कपूरथला येथील सुभानपूर रोडवरील निजामपूर गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये एका तरुणाची अपवित्रतेच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती.