Dog Attack in Kerala: गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने केरळमध्ये आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना हरिप्पड कोटाक्कम येथे घडली आहे. देवनारायण असं मुलाचे नाव होते. महिनाभरापूर्वी भटक्या कुत्र्याने देवनारायणवर हल्ला केला होता. गुरुवारी त्याला श्वसानाचा त्रास झाला त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला अशी माहिती माध्यमांना मिळाली. (हेही वाचा- आता कुत्रा चावल्यावर सरकारला द्यावी लागणार भरपाई; दाताच्या प्रत्येक खुणेसाठी मिळणार 10,000 रुपये, न्यायालयाचे निर्देश)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी थाटारंबलम येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर अलपुझा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. २३ एप्रिल रोजी देवनारायण खेळण्यासाठी बाहेर गेला होता त्यावेळीस, एकाने बॉल भटक्या कुत्र्याच्या अंगावर फेकला. भटक्या कुत्र्याने देवनारायणचा पाठलाग केला. धावत पळत जात असताना, तो नाल्यात पडला. नाल्यात पडल्याने त गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत देवनारायण कसा बसा घरी पोहचला.
कुत्रा लावल्याच्या कुणताच खुणा नव्हत्या त्यामुळे कुटुंबाला असं वाटले की, तो नाल्यात पडल्याने जखमी झाला असावा. त्यामुळे त्यांनी रेबिजचे लसिकरण दिले नाही. आठवडाभरानंतर त्याला रेबिजचे लक्षण दिसू लागली. त्याच्यावर उपचार सुरु झाले परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.