University of Mumbai कडून हिवाळी हंगामातील परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू होणार होत्या पण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागाणीनुसार बदल करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता नवं वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून mu.ac.in या त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जारी केले आहे.
नव्या वेळापत्रकामध्ये आता सार्या शाखांच्या परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहे. या परीक्षा दिवाळी नंतर म्हणजे नोव्हेंबर 18 पासून सुरू होणार असून फेब्रुवारी 21 पर्यंत चालणार आहे.तर ह्युमॅनिटी कॉर्सेसच्या परीक्षा 4 नोव्हेंबरला सुरू होतील आणि 2 फेब्रुवारीला संपणार आहेत.
मागील आठवड्यामध्ये सायन्स शाखेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी राज्यभरातून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पत्र अॅडमिनिस्ट्रेशन कडे पाठवली होती. त्या पत्रांची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करत परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाचे Director of Board of Examinations and Evaluations - Dr Prasad Karande यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्या परीक्षा आता दिवाळी नंतरच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्या शाखांच्या मिळून 450 परीक्षा होणार आहेत. त्या प्रत्येकाचे वेगळे वेळापत्रक जारी झाले आहे.