SSC Exam Calendar 2024-25: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून संभाव्य वेळापत्रक जारी; ssc.nic.in वर पहा परीक्षांच्या तारखा
Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

SSC releases tentative exam calendar for 2024-2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) कडून 2024-25 साठी संभाव्य वेळापत्रक जारी केलं आहे. दरम्यान सरकारी नोकरीसाठी विविध विभागात घेतल्या जाणार्‍या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक ssc.nic.in वर जारी करण्यात आलं आहे.

ग्रेड 'सी' स्टेनोग्राफर लिमिटेड डिपार्टमेंटल कम्पिटेटीव्ह एक्झाम 2023-24, JSA/LDC ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कम्पिटेटीव्ह एक्झाम 2023-24, SSA/UDC ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कम्पिटेटीव्ह एक्झाम 2023-24, Selection Post Examination, Phase–XII, 2024 एप्रिल- मे 2024 मध्ये होणार आहे. या परीक्षांसाठीचे नोटिफिकेशन 5,12,19 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2024 दिवशी जारी करण्यात येणार आहे.

Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2024 चं नोटिफिकेशन एप्रिल महिन्यात जारी करण्यात येईल. तर परीक्षा जून जुलै महिन्यात होणार आहे. Combined Graduate Level Examination, 2024 सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होईल. Multi Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2024 जुलै ते ऑगस्ट दरम्यान होणार आहे. Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical and Quantity Surveying & Contracts) Examination, 2024 साठी रजिस्ट्रेशन 29 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. 29 मार्चला ही परीक्षा संपेल.

इथे पाहा वेळापत्रक

ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर आणि ग्रेड सी आणि डी स्टेनेग्राफर परीक्षा 2024 यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. Central Armed Police Forces, NIA, SSF and Rifleman (GD) in Assam Rifles मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी परीक्षा डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान होण्याची शक्यता आहे.