SSC CHSL Result 2019 Declared: अंतिम निकाल ssc.nic.in वर जाहीर; कसे पहाल तुमचे मार्क्स?
Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

स्टाफ सिलेक्शन कमिशनची कम्बाईंड हायर सेकेंडरी(10+2) 2019 (Staff Selection Commission, Combined Higher Secondary) च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. आज 10 मे दिवशी विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. SSC CHSL Final Results ऑनलाईन पाहण्यासाठी उमेदवारांना ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. CHSL निकाल पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे.

SSC CHSL Result 2019 चा अंतिम निकाल कमिशन कडून स्किल टेस्ट घेतल्यानंतर जाहीर करण्यात आला आहे. स्किल टेस्ट निकाल फेब्रुवारी 28, 2022 दिवशी जाहीर झाला होता. या निकालानंतर तब्बल 13,000 उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी पात्र ठरले होते.

आता CHSL Final Results 2019 मध्ये 4500 पेक्षा अधिक उमेदवार अंतिम नोकरभरतीसाठी पात्र ठरले आहेत. या CHSL निकालानंतर उमेदवारांची LDC/JSA/JPA/PA/SA पदांवर भरती होणार आहे. हे देखील नक्की वाचा: UPSC Calendar 2023: यूपीएससी 2023 परीक्षांचे वेळापत्रक जारी; Civil Services Prelims Exam 28 मे दिवशी; upsc.gov.in वर पहा सविस्तर.

कसा पहाल ऑनलाईन निकाल?

  • Staff Selection Commission ची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  • होमपेजवर 'Combined Higher Secondary Level (10+2) Examination, 2019 -Declaration of Final Result.' या लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज वर एक पीडीएफ ओपन होईल.
  • या यादीमध्ये तुमचं नाव शोधा.

इथे पहा निकलाची डिरेक्ट लिंक!

दरम्यान निवडलेल्या आणि  निवडलेल्या न गेलेल्या उमेदवारांचे तपशीलवार गुण 17 मे 2022 रोजी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणीकृत पासवर्ड वापरून त्यांचे वैयक्तिक गुण तपासू शकतात.  Result/Marks tab या  डॅशबोर्डवर  04 जून 2022 पर्यंत मार्क्स दिसतील.