SBI Exam 2021 Postponed: स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्टच्या पदांवर भरतीसाठी विहित केलेल्या निवड प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली आहे. बँकेने मंगळवारी 18 मे 2021 रोजी एसबीआय फार्मासिस्ट ऑनलाईन परीक्षा 2021 आणि डेटा अॅनालिस्ट ऑनलाइन परीक्षा 2021 पुढे ढकलण्याबाबत नोटीस जारी केली. एसबीआय फार्मासिस्ट आणि डेटा विश्लेषक ऑनलाइन परीक्षा 23 मे 2021 रोजी घेण्यात येणार होती. गेल्या दोन आठवड्यात एसबीआयने दोन्ही पदांसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र दिले होते.
देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेतील संक्रमणाच्या वाढत्या घटना लक्षात घेता स्टेट बँकेने फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्टच्या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली आहे. एसबीआयने दिलेल्या अधिकृत नोटीसनुसार, "कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, 23 मे 2021 रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा पुढील सूचना होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे." (वाचा - CBSE 10th Result 2021 Date: सीबीएसई 10 वीचा निकाल आता जुलैमध्ये; मार्क्स सबमिट करण्याच्या तारखांमध्येही बदल)
एसबीआयतर्फे फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्टच्या पदांवर भरतीसाठी घेतलेली परीक्षा साथीच्या आजारामुळे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा ही वस्तुनिष्ठ चाचणी असेल ज्यासाठी एकूण 120 मिनिटांची वेळ निश्चित केली गेली आहे. या परीक्षेत एकूण 200 गुण असतील आणि जनरल अवेयरनेस, सामान्य इंग्लिश, संख्यात्मक क्षमता, तर्क आणि व्यावसायिक ज्ञानाचे एकूण 5 विभाग असतील.
एसबीआयने फार्मासिस्ट आणि डेटा अॅनालिस्ट परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी अभ्यासक्रम आणि योजनेची माहिती जाहीर केली आहे. दुसरीकडे भरती अधिसूचनामध्ये बँकेने उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी एक नमुना प्रश्नपत्रिका देखील दिली आहे. उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात.