Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 1664 रिक्त पदांवर नोकर भरती, 8 वी पास उमेदवारांना करता येईल अर्ज
Representational Image (Photo Credits: PTI)

Railway Recruitment 2021: नॉर्थ सेंट्रल रेल्वेकडून अप्रेंटिस पदाच्या 1664 रिक्त जागांवर नोकर भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी उत्तम मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrcpryj.org येथे भेट द्यावी. या नोकर भरतीसाठी 8 वी पास उमेदवारांना सुद्धा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.(IDBI Bank Recruitment 2021: आयडीबीआय बँकेत 920 रिक्त पदांवर नोकर भरती, 18 ऑगस्ट पर्यंत करता येईल अर्ज)

उमेदवारांची भरती प्रयागराज, झासी आणि आगरा विभागात केली जाणार आहे. यासाठी रिक्त जागांबद्दल अधिक माहिती नोटिफिकेशन मध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांना फिटर, वेल्डर, वाइंडर, मशीनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मॅकानिक आणि वायरमॅनच्या ट्रेड्सवर भरती केली जाणार आहे. एकूण 1164 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड होणार आहे. अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.

विविध विभागांमध्ये शिकाऊंची ही पदे काढण्यात आली आहेत. रेल्वे एडनुसार, प्रयागराज विभागात 364, झाशी विभागात 480, झाशी कार्यशाळेत 185 आणि आगरा विभागात 296 पदांची भरती केली जाईल. श्रेणीनुसार रिक्त जागा पाहण्यासाठी आपण वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना डाउनलोड करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबक 2021 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कमीत कमी 50 टक्के गुणांसह 10 वी पास असावे. तसेच वेल्डर, वायरमॅन आणि कार्पेंटर ट्रेडसाठी 8 वी उत्तीर्ण असावी. उमेदवारांची निवड ही परिक्षा न घेता मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये तर राखीव वर्गासाठी निशुल्क आहे. अर्ज करताना संपूर्ण माहिती आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करणे आश्यक आहे.