IDBI Bank Recruitment 2021: आयडीबीआय बँकेत 920 रिक्त पदांवर नोकर भरती, 18 ऑगस्ट पर्यंत करता येईल अर्ज
Representational Image (Photo Credits: File Photo)

IDBI Bank Recruitment 2021:  आयडीबीआय बँकेत नोकरीची करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. कारण आयडीबीआय बँकेने देशभरातील आपल्या विविध शाखांमध्ये आणि ऑफिसमध्ये एक्झिक्युटिव्ह पदांवर नोकर भरतीसाठी एक नोटीस जाहीर केली आहे. बँकेद्वारे 3 ऑगस्ट रोजी भरतीसाठी घोषणा करत एकूण 920 पदांवर नोकर भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. योग्य उमेदवाराला अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळल idbibank.in येथे भेट द्यावी लागणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्जाची प्रक्रिया 4 ऑगस्ट 2021 पासून सुरु होणार आहे. उमेदवारांना 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना बँकेद्वारा निर्धारित अर्ज शुल्कासह 1 हजार रुपयांचे शुल्क सुद्धा भरावे लागणार आहेत. उमेदवारांना त्यानंतर 2 सप्टेंबर 2021 पर्यंत अॅप्लिकेशनचे प्रिंट करता येईल.(15 ऑगस्ट पासून बदलणार बँक अकाउंट संबंधित 'हा' नियम अन्यथा थांबेल तुमचे पेमेंट)

या नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही विषयात 55 टक्के गुण मिळालेले असावे. त्याचसोबत उमेदवाराचे वय 1 जुलै 2021 रोजी 20 वर्षापेक्षा कमी आणि 25 वर्षापेक्षा अधिक नसावे. दरम्यान, एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांगसह अन्य राखीव वर्गासाठी सरकारच्या नियमानुसार अधिकाधिक वयात सुट दिली जाणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाईन परिक्षा पद्धतीने केली जाणार आहे. परिक्षेत रीजनिंग, इंग्रजी भाषा संबंधित 50-50 प्रश्न विचारले जाणार आहेत. परिक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असणार आहे.