NEET PG 2019 Results: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) गुरुवारी (31 जानेवारी) नीट परिक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. तर या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल natboard.edu.in किंवा nbe.edu.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. नीट परिक्षेचे आयोजन हे मास्टर ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसन (MD) आणि मेडिकल PG डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते.
नीट परिक्षेची एन्ट्रन्स परिक्षा (Entarance Exam) 6 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थी सोडून उर्वरित विविध राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती. देशभरातून या परिक्षेसाठी 165 केंद्रावर परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नीट पीजी 2019 साठी एकूण 1,48,000 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. त्यामुळे आता सर्व विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्याची खूप उत्सुकता लागून राहीली आहे. तसेच विद्यार्थी निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका nbe.edu.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकणार आहेत.
असा पाहा निकाल:
- सर्वात प्रथम nbe.edu.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
-क्लिक केल्यानंतर विचारण्यात आलेली माहिती द्या.
-त्यानंतर Apply या ऑप्शनवक क्लिक करुन तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
-निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रत घेणे आवश्यक आहे.