NEET, JEE Exam 2020: नीट, जेईई विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय खुला- एनटीए
Exam | Representational Image (Photo credits: Pixabay)

नीट आणि जेईई परीक्षा (NEET, JEE Exam 2020) देणाऱ्या जवळपास 27 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे आणि सोईनुसार परीक्षा केंद्र (Examination Center) निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. देशभरात कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करावा लागणे धोक्याचे आहे. हा धोका विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जेईई आणि नीट परीक्षांसाठी दूरचा प्रवास करावा लागणार नाही.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना जीईई, नीट परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास करावा लागू नये. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने याबाबत अधिकृत माहिती दिली. एनटीए महानिदेशकांनी म्हटले की, नीट परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या पसंतीचे कोणतेही शहर किंवा परीक्षा केंद्र परीक्षा देण्यासाठी निवडू शकतात.

नीट परीक्षेसाठी सुमारे 16.84 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. सर्वच्या सर्व 16.84 लाख विद्यार्थी आपल्या सोईनुसार परीक्षा केंद्र निवडीस आणि त्यानुसार फॉर्ममध्ये (अर्ज) बदल करण्यास पात्र आहेत. जेईई मुख्य परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत होईल. नीट परीक्षा 13 सप्टेंबर होणार आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षा 27 सप्टेंबरला होईल. त्या आधी जेईई परीक्षा 18 जुलै ते 23 जुलै यादरम्यान आणि नीट परीक्षा 26 जुलै ला होणार आहे. (हेही वाचा, NEET 2020 Exam: 13 सप्टेंबर रोजी होणार 'नीट' परीक्षा; ntaneet.nic.in वर लवकरच जारी होईल Admit Cards)

कंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, कोरोना व्हायरस या साथीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने आणि आरोग्य मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन सक्तीने करण्यात यावे. जेणेकरुन कोरोना व्हायरस संसर्गापासून विद्यार्थी दूर राहावेत.