वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षा NEET UG 2020 ही 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळात परीक्षा घेतली जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) ने 20 ऑगस्ट 2020 रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. ही नोटीस विद्यार्थ्यांना nta.ac.in या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती आधीच कळवली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर याची अद्यावत माहिती उपलब्ध असेल, असे NTA कडून सांगण्यात आले आहे. (NEET Exam Pattern 2020: मेडिकल कॉलेज प्रवेश मिळण्यासाठी जाणून घ्या 'नीट' परीक्षा फॅक्टर)
विद्यार्थ्यांची गैरसोय आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी दुसऱ्या राज्यात जाणे कठीण होऊ शकते. त्यामुळे परीक्षा केंद्रांचे वाटप आधीच करण्यात येणार आहे. NTA ची नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
त्याचप्रमाणे परीक्षेसाठीचे अॅडमीट कार्ड्स (Admit Cards) लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केले जाईल. अॅडमीट कार्डवर उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र क्रमांक आणि पत्ता, परीक्षा केंद्रावर पोहचण्याची वेळ, परीक्षागृहात प्रवेश करण्याची वेळ आणि केंद्र बंद होण्यासाची वेळ या बाबी नमूद केल्या असतील.
जेईई (मुख्य) आणि एनईईटी परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (17 ऑगस्ट) फेटाळून लावली. कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार होती. परंतु, विद्यार्थ्यांचे अमूल्य वर्ष वाया जावू नये आणि जीवन सुरुच राहील असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.