Student | File Photo

Evaluation Model for Class 12 Board Exams: National Council of Educational Research and Training अर्थात NCERT कडून बारावीच्या परीक्षेसाठी नवी मूल्यांकन पद्धती सूचवण्यात आली आहे. NCERT च्या माहिती नुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन आता विद्यार्थ्यांच्या इयत्ता 9-11 वी च्या आधारे होणार आहे. यामध्ये व्होकेशनल आणि स्किल बेस्ड ट्रेनिंगचा देखील समावेश असणार आहे. 'Establishing Equivalence across Education Boards,'असा हा रिपोर्ट बनवण्यात आला आहे. या अहवालामध्ये इयत्ता 9-11 मधील विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीच्या मेट्रिक्सचा समावेश आहे.

कशी असणार नवी मूल्यांकन पद्धती

नव्या मूल्यांकन पद्धती मध्ये इयत्ता नववीचे गुण 15%, इयत्ता दहावीचे गुण 20% 11 वीचे गुण 25% आणि 40% उर्वरित गुण बारावीचे असणार आहे. अहवालात मार्किंग स्किम 9वी ते 12वी मध्ये असणार आहे.

PARAKH म्हणजेच Performance Assessment, Review, and Analysis of Knowledge for Holistic Development ही केंद्रीय संस्था NCERT कडून स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अख्यत्यारिखाली तिअचं काम चालतं. यापूर्वी देखील त्यांच्याकडून standardised assessment approach देशात सार्‍या शिक्षण बोर्डामध्ये असावा अशी सूचना देण्यात आली होती. Data Management, Coding, Application Development, Artificial Intelligence, Music, Arts,आणि Crafts अशा व्होकेशनल आणि स्किल बेस्ड विषयांच्या समावेशाचा त्यांनी पुरस्कार केला होता. नक्की वाचा: Mother Suicide for CBSE Education: सीबीएसई शिक्षणाआड येणाऱ्या गरीबिला कंटाळून आईची मुलीसह आत्महत्या; निलंगा येथील घटना .

रिपोर्ट मध्ये त्यांनी शिक्षकांच्या कार्यपद्धतीचेही देखील मूल्याकन करून घेणं आणि शाळेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शाळेत पाण्याची उपलब्धता, सुसज्ज ग्रंथालये आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पुरेशा क्रीडा सुविधांची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.