सीबीईएसई (CBSE) पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देखील विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये Open Book Exam देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, MSBSHSE अर्थात Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education चे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी 29 फेब्रुवारीला मंडळाकडून काही शाळांमध्ये Open Book Exam चा पर्याय देण्यासाठी विचार सुरू असून त्याची अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते याचं प्लॅनिंग सुरू असल्याचं म्हटलं आहे.
Mid-Day सोबत बोलताना शरद गोसावींनी Open Book Exam ला विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात? परीक्षांमध्ये त्याचा परिणाम दिसतो याचा अभ्यास केला जाईल असं म्हटलं आहे. सीबीएससी बोर्डाकडून Open Book Exam हा पर्याय 9वी ते 12वी च्या काही विशिष्ट विषयांच्या परीक्षेसाठी प्रायोगिक तत्त्वावर तपासून पाहिली जाणार आहे. तसाच प्रयत्न राज्य शिक्षण मंडळाच्या काही शाळांसाठी देखील केला जाऊ शकतो.
राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात या पॅटर्नच्या संभाव्य फायद्यांबाबत चर्चा झाली आहे. मात्र अद्याप कोणताही अंमलबजावणीच्या बाबतीमधील ठोस निर्णय झालेला नाही. कोणताही निर्णय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे याची खात्री करण्यासाठी संपूर्ण चाचणी आणि मूल्यमापनानंतरच घेतला जाईल. असेही सांगण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (NCF) 2023 सोबत राहत खुल्या पुस्तक परीक्षेसाठी चालवण्यात येणारी पायलट इयत्ता नववी आणि दहावीसाठी इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र या विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहे.
विद्यार्थ्यांना अशा चाचण्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे मूल्यांकन करणे आणि शिक्षक आणि विद्यार्थी दोघांकडून अभिप्राय गोळा करणे हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी CBSE दिल्ली विद्यापीठाकडून या पायलट प्रोजेक्टसाठी मदत घेत आहे. सध्याचया माहितीनुसार या प्रोजेक्टचं डिझाइन जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.