
MSBSHSE Class 10 Result 2022: राज्य शिक्षण मंडळाकडून आज दुपारी 1 वाजता 10वीचा बोर्डाचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर विद्यार्थी त्यांचा निकाल रोलनंबर आणि आईचं नाव टाकून पाहू शकणार आहेत. यंदा दहावीची परीक्षा दोन वर्षांच्या कोविड संकटाच्या काळानंतर ऑफलाईन पार पडली आहे. त्यामुळे निकालाकडे सार्यांच्या नजरा लागल्या आहेत. दुपारी 11 च्या सुमारास बोर्डाच्या 9 विभागांचा एकूण निकालाची आकडेवारी जाहीर होईल त्यानंतर 1 वाजता विषय निहाय निकाल जाहीर होईल. दहावीची परीक्षा यावर्षी 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधी मध्ये पार पडली आहे. या परीक्षेला अंदाजे 17 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता त्यांना निकालाचे वेध लागले आहेत. नक्की वाचा: mahresult.nic.in वर जाहीर होणार 10 वी परीक्षेचा निकाल, उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची आवश्यकता; जाणून घ्या मागील पाच वर्षांतील उत्तीर्णांची सरासरी टक्केवारी.
कुठल्या वेबसाईट्सवर निकाल पहाल?
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10वीचे विद्यार्थी mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट्सवर विषयनिहाय निकाल पाहू शकणार आहेत.
10 वीचा निकाल ऑनलाईन कुसा पहाल?
- 10 वीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 10वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.