Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा वेळापत्रक 2020 (MHT-CET Exam Time Table 2020) जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक आणि इच्छुकांसाठी हे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या वेळापत्रकात पीसीबी ग्रुप (PCB Group), पीसीएम ग्रुप (PCM Group) परीक्षा तारखा, वेळ उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी परीक्षा वेळापत्रक डाऊनलोड (MHT-CET Exam Time Table 2020 Download) करता येणार आहे. तसेच ताज्या अपडेट आणि सूचना यांबाबत माहिती मिळवता येणार आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीने विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा राज्यात रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे एमएचटी-सीईटी परीक्षा होणार की नाही याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सीईट परीक्षा घेण्यास परवानगी दिली आणि या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर सेलने परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार तारखा खालीर प्रमाणे. (हेही वाचा, JEE Main Result 2020 Date: यंदा NTA कधीपर्यंत जाहीर करू शकते Merit List? जाणून घ्या जेईई मुख्य परीक्षा निकाला बद्दल)

पीसीबी ग्रुप (PCB Group) - 1,2,4,5,6,7,8,9 ऑक्टोबर 2020

पीसीएम ग्रुप (PCM Group) -12,13,14,15,16,19,20 ऑक्टोबर 2020

MHT-CET Exam Time Table कसे कराल डाऊनलोड?

जर तुम्हाला अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा वेळापत्रक पाहायचे असेल, डाऊनलोड करायचे असेल तर www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळाला भेट दिल्यावर आवश्यक तपशील दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक, पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. तसेच, या संकेतस्थळावर आपणास परीक्षेसंदर्भातील ताज्या अपडेट आणि सूचनाही पाहता येणार आहेत.

अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच MHT-CET परीक्षा घेणयाबाबत दाखल झालेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटळून लावली होती. या याचिकेत राज्यातील कोरोना व्हायरस संकट पाहता MHT-CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारत याचिका फेटाळून लावली. आता न्यायालयाच्याच परवानगीने ही परीक्षा पार पडणा आहे.

राज्यात असलेले कोरोना व्हायरस संकट आणि कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता परीक्षा रद्द करण्यात याव्यात किंवा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी होत होती. या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही अनेक संस्था संघटनांनी याचिका दाखल केली होती. मात्र, फार फार तर परीक्षा युजीसीच्या परवानगीने पुढे ढकलता येऊ शकतात. त्यांच्या तारखा बदलता येऊ शकतात. मात्र, परीक्षा घ्याव्याच लागतील, असे न्यायालयाने म्हटले होते.