Mazagon Dock Recruitment 2021: माझगाव डॉक येथे ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी नोकरभरती; 8 वी, 10 वी पास विद्यार्थी करू शकतात अर्ज, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, पदांची नावे व पगार
Job | File Photo

Mazagon Dock Recruitment 2021: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) ने ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. माझगाव डॉक अ‍ॅप्रेंटिस भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्याची मुदत 23 डिसेंबर 2020 पासून सुरु झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 11 जानेवारी 2021 आहे. 3 श्रेणी अंतर्गत एकूण 410 रिक्त जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गट ए (दहावी उत्तीर्ण), गट बी (I.T.I उत्तीर्ण) आणि गट सी (आठवी उत्तीर्ण) यांचा समावेश आहे. जे उमेदवार वरील पदांसाठी यशस्वीरित्या अर्ज भरतील त्यांना Computer Based Test साठी बोलावले जाईल. ही चाचणी साधारण फेब्रुवारी 2021 च्या दुसर्‍या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा-

  • ऑनलाईन अर्जाची सुरुवातः 23 डिसेंबर 2020
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2021 (सोमवार)
  • ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेश पत्र/हॉल तिकीट देण्याची तात्विक तारीख - फेब्रुवारी 2021 चा पहिला आठवडा

पदांची नावे –

  • गट अ (दहावी उत्तीर्ण) - इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर
  • गट बी (आयटीआय उत्तीर्ण) - आयसीटीएसएम, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर स्ट्रक्चरल (उदा. आयटीआय फिटर), सुतार
  • गट सी (आठवी उत्तीर्ण) - रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)

माझगाव डॉक अ‍ॅप्रेंटिस प्रशिक्षण कालावधी -

  • गट अ (दहावी उत्तीर्ण) - 2 वर्षे
  • गट बी (I.T.I उत्तीर्ण) - 1 वर्ष
  • गट सी (आठवी उत्तीर्ण) - रिगर (2 वर्षे) आणि वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) (1 वर्ष आणि 3 महिने)

शैक्षणिक पात्रता-

प्रथम प्रयत्नात सामान्य विज्ञान आणि गणितासह एसएससी. सर्वसाधारण / ओबीसी / एसईबीसी / ईडब्ल्यूएस / एएफसी / दिव्यांग एकूण 50 % गुणांसह एससी, एसटीला पहिल्या प्रयत्नात पास गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी या सविस्तर अधिसूचना लिंक क्लिक करा.

वय मर्यादा-

स्टायपेंड/पगार-

  • गट अ (दहावी उत्तीर्ण) - रु. प्रथम वर्षासाठी 6000/- आणि 6600 रू. द्वितीय वर्षासाठी
  • गट बी (आय.टी.आय उत्तीर्ण) - आयसीटीएसएम, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि फिटर स्ट्रक्चरल (उदा. आयटीआय फिटर) साठी 8050 रुपये आणि सुतारसाठी 7700 हजार रुपये
  • गट सी (आठवी उत्तीर्ण) - प्रथम वर्षासाठी 5000 रु. 5500 रु. द्वितीय वर्षासाठी