कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात देशातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. अभ्यासामध्ये होणारी तुट भरून काढण्यासाठी मुलांना ऑनलाईन शिक्षण (Online Education) दिले जात आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणासाठीही देशात बर्याच ठिकाणी मुलांना नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे. विशेषत: दुर्गम खेड्यात राहणाऱ्या मुलांना या समस्येचा जास्तच सामना करावा लागतो. यासंदर्भात एक प्रकरणही समोर आले आहे, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे मुले शाळेच्या खोल्यांमध्ये नाही, तर चक्क झाडावर शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धाडगाव (Dhadgaon) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी झाडाच्या फांद्यांवर चढत आहेत. आजकाल महाराष्ट्रात अनेक खेड्यांमध्ये झाडांवर शिकणार्या मुलांचे दृश्य पहावयास मिळत आहे. धाडगाव येथील शिक्षक लक्ष्मण पवार, जमिनीवर मोबाईलचे नेटवर्क व्यवस्थित नसल्याने मुलांना डोंगरावर किंवा झाडावर नेऊन शिकवण्याचे काम करीत आहेत. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, विभागीय अधिकारी नाशिक प्रवीण पाटील म्हणाले की, जिथे मुलांना नेटवर्क मिळते तिथेच ते अभ्यास सामग्री डाउनलोड करून अभ्यास करतात.
एएनआय ट्वीट -
Maharashtra: Man in Dhadgaon village, Nandurbar district gives lessons to children using smartphones while sitting atop a tree, in order to get better network connectivity.
Deputy Director Education Divisional Nashik Pravin Patil says, the area has fewer mobile network towers. pic.twitter.com/MqOoUXYaPN
— ANI (@ANI) August 18, 2020
अहवालानुसार धाडगाव येथील शालेय मुलांना स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाइन शिक्षण दिले जात आहे. कोरोना महामारीमुळे अभ्यासाची सामग्री ऑनलाइन उपलब्ध केली गेली आहे. शालेय वर्गात अभ्यासाचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी व मोबाइलवरून शिकवण्याकरिता योग्य मोबाईल नेटवर्क नसते, अशा परिस्थितीत अभ्यासात व्यत्यय येतो. यावर शिक्षक लक्ष्मण पवार यांनी नेटवर्कची समस्या टाळण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. ते झाडांवर चढून किंवा डोंगरावर जाऊन मुलांना शिकवत आहे. उंचीवर योग्य नेटवर्ककडे येत असल्यामुळे, अभ्यास सामग्री डाउनलोड करण्यात कोणतीही अडचण नाही व मुलांचा अभ्यास पूर्ण होत आहे. (हेही वाचा: भारताबाहेर शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; आता परदेश शिष्यवृत्तीसाठी 28 ऑगस्टपर्यंत करू शकाल अर्ज, मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती)
दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वाधिक बाधित राज्य आहेत. काल राज्यात कोरोनाचे आणखी 8493 रुग्ण आढळून आले असून, 228 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाखांच्या पार गेला आहे.