Maharashtra Board 12th HSC Result 2023: बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता पहा mahresult.nic.in वर
HSC Result 2023| File Image

MSBSHSE 12th Result 2023:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वी चा निकाल (HSC Result) आज म्हणजेच 25 मे दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय पार पडली आहे. काल बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज निकाल mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.  संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर यंदा 12वीची परीक्षा पार पडली. आज केवळ ऑनलाईन निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना कॉलेजकडून मूळ गुणपत्रिका 6 जूनला दिली जाणार आहे.

12वीचा ऑनलाईन निकाल आज कुठे पाहू शकाल?

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

12वीचा निकाल कसा पहाल?

- mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

-अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.

त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा

-आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.

-त्यापुढे View Result वर क्लिक करा

-तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल

-तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

अपेक्षित निकाल लागला नसेल तर काय कराल?

बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यावर जर तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेलं नसतील तर गुणांची फेर पडताळणी करायचा पर्याय वापरता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.