महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 25 मे दिवशी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 2 नंतर mahresult.nic.in वर गुण पाहता येणार आहे. राज्यभरातील 9 विभागीय मंडळांचा निकाल उद्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स शाखेचा निकाल सोबत व्होकेशन कोर्सचा देखील निकाल जाहीर केला जाणार आहे. 12वीची परीक्षा यंदा 21 मार्च दिवशी संपली होती आता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2023: बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन कसा आणि कुठे पहाल?
पहा ट्वीट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा, अर्थात बारावीचा निकाल उद्या म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार. #HSCResult #Maharashtra @msbshse @DDNewslive pic.twitter.com/LNnxe9nmrL
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)