Maharashtra Board 12th Result 2023:  बारावीचा  निकाल उद्या ऑनलाईन कसा आणि कुठे पहाल?
Online | Pixabay.com

MSBSHSE 12th Result 2023:  यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान 12वीची अर्थात HSC परीक्षा पार पडली आहे. बारावीची परीक्षा यंदा कोविड संकटानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडली आहे. त्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने पारपडलेल्या या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ऑफलाईन स्वरूपात बोर्डाचे सारे पेपर सुरळीत पार पडले आहेत. यंदा 12 वीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) 25 मे गुरूवारी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 2 नंतर विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सोय केली आहे. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

12वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स कोणत्या?

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्ससोबतच काही थर्ड पार्टी वेबसाईट्स देखील सज्ज ठेवल्या जातात. त्यामुळे खालील वेबसाईट्सवर निकाल पाहू शकाल.

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

12 वीचा ऑनलाईन निकाल कसा पहाल ?

  1. बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
  2. आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.
  3. त्यापुढे View Result वर क्लिक करा.
  4. तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
  5. तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयातून विद्यार्थी घेऊ शकतील. बारावी नंतर आठवडाभरामध्ये यंदा 10वीचा देखील निकाल जाहीर केला जाईल. दहावी निकालाची मात्र तारीख अद्याप बोर्डाने जाहीर केलेली नाही. मागील 8-15 दिवसांमध्ये सीबीएसई बोर्ड आणि CISCE कडून देखील 10वी, 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत.