JEE Main 2022 Session 2 Admit Card Released: 21 ऐवजी 25 जुलैपासून होणार्‍या जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड जारी
online ((Photo Credits: Pexels)

JEE Mains 2022 च्या दुसर्‍या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 21 जुलैला होणारी परीक्षा 25 जुलैला होणार आहे. या परीक्षेसाठी अ‍ॅडमीट कार्ड जारी करण्यात आली आहे. jeemain.nta.nic.in या वेबसाईट वरून विद्यार्थ्यांना त्यांची अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करता येणार आहे. JEE Main 2022 ही परीक्षा आता हिंदी, बंगाली, मराठी सह प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार आहे.

JEE (मुख्य) ही JEE (अ‍ॅडव्हान्स) साठीची पात्रता परीक्षा आहे, जी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. देशातील B. Arch आणि B. Planning अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेपर 2 घेतला जातो. हे देखील नक्की वाचा: NEET UG 2022 Bra Row: केरळ मध्ये नीट परीक्षार्थी विद्यार्थीनीला छळवादी वागणूक मिळाल्याच्या प्रकरणी 3 सदस्यीय समिती स्थापना.

कसे डाऊनलोड कराल अ‍ॅडमीट कार्ड ?

  • jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
  • JEE Main Session 2 Admit Card 2022 link वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स सबमीट करा.
  • आता स्क्रिन वर अ‍ॅडमीट कार्ड दिसेल.

6,29,778 विद्यार्थी सुमारे 500 शहरांमधून जेईई ची परीक्षा देणार आहेत. तर भारताबाहेरील 17 शहरांमधून विद्यार्थी जेईई ची परीक्षा देणार आहेत. जेईई चं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि बर्थ डेट द्यावी लागणार आहे.