JEE Main 2020 Result जाहीर! jeemain.nic.in वर असा तपासा तुमचा निकाल
प्रातिनिधीक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) तर्फे शुक्रवारी, 17 जानेवारी रोजी रात्री सामाईक प्रवेश परीक्षा (JEE)  निकाल जाहीर करण्यात आला आहे. jeemain.nic.in. या JEE च्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचा निकाल उपलब्ध आहे. यंदा 7  ते 9 जानेवारी दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये आठ राज्यातील 9 विद्यार्थ्यांनी संपूर्ण 100 पर्सेन्टाइल मिळवून यश मिळवले आहे. यात राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तेलंगणाच्या 2-2 विद्यार्थ्यांचा तर दिल्ली, गुजरात, हरियाणाच्या 1-1  विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काही सोप्प्या स्टेप्स वापरून तुंही हा निकाल पाहू शकता.

यंदा JEE साठी देशभरातून तब्बल 8.69 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ४१ जणांना मेरिट मध्ये स्थान मिळाले आहे. Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक

असा तपासून पहा तुमचा निकाल

  1. सर्वात आधी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जा
  2. view result/score card वर क्लिक करा
  3. परीक्षा सीट नंबर, जन्मतारीख, इत्यादी डिटेल्स भरून सबमिट करा
  4. तुमचा रिझल्ट समोर दिसेल. त्याची प्रिंट काढून घ्या

दरम्यान, जानेवारी परीक्षेनंतर आता लवकरच एप्रिलच्या जेईई मेन ची नोंदणी सुरु होणार आहे. यासाठी 7 फेब्रुवारी ते 7  मार्च दरम्यान ओनलाईन अर्ज करता येणार आहे. ही परीक्षा 5, 7, 9 आणि 11 एप्रिल अशा दिवशी घेतली जाणार आहे.