IRCTC मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक
IRCTC. (Photo Credit: File Photo)

IRCTC Apprentice 2021: जर तुम्ही इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसी मध्ये अप्रेंटिसशिपमध्ये रिक्त जागांवर नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.(BPCL Apprentice Recruitment 2021: भारतात पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिस मध्ये 87 पदांवर नोकर भरती)

आयआरसीटीसी अप्रेंटिसशिप अंतर्गत 100 ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी मधून 10 वी पास असणे अनिवार्य आहे. यावरील अधिक शिक्षण झालेल्या उमेदवारांना ही नोकर भरतीसाठी अर्ज करता येईल.

आयआरसीटीसी मध्ये 100 ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावा. उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल, ज्यासाठी त्यांना नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासारख्या मूलभूत तपशील भराव्या लागतील. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे किंवा वाटप केलेल्या उमेदवाराचा कोड आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करून IRCTC मध्ये अॅप्रेंटिसशिप, 100 ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यकासाठी अर्ज सबमिट करा.

तसेच नियम आणि अटीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर 15 महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप ऑफर केली जाणार असून प्रथम बेसिक ट्रेनिंग आणि त्यानंतर 12 महिने ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 7,000 ते 9,000 रुपये दरमहा वेतन दिले जाईल. तसेच, त्यांना NAPS चे फायदे दिले जातील. उमेदवारांना आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल.