Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौसेनेत नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Indian Navy Recruitment 2021: जर तुम्हाला भारतीय नौसेनेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण भारतीय नौसेनेकडून 10+2 (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्किमसाठी अर्ज मागितले आहेत. ही नोकर भरती विविध शाखांसाठी केली जाणार आहे. यामध्ये शिक्षण, एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निकल शाखेचा समावेश आहे. या शाखांसाठी अविवाहित आणि पुरुषांची निवड केली जाणार आहे.(Arogya Vibhag Maharashtra: आरोग्य विभागाच्या 6205 जागांसाठी 25-26 सप्टेंबर रोजी परीक्षा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उमेदवारांना दिल्या महत्वाच्या सुचना Watch Video)

या नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोंबर दिली गेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

>>महत्वाच्या तारखा

-ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: 10 ऑक्टोंबर, 2021

-ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 ऑक्टोंबर, 2021

>>नोकर भरती रिक्त पद

-शिक्षण विभाग: 05 पद

-एक्झिक्युटिव्ह अॅन्ड टेक्निकल: 30 पद

नौसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिक, रसायन विज्ञान आणि गणित (पीसीएम) मध्ये कमीत कमी 70 टक्के गुणांसह सीनियर माध्यमिक परीक्षा (10+2 पॅटर्न) उत्तीर्ण असावे. इंग्रजीत कमीत कमी 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.  या व्यतिरिक्त क्वालिफिकेशन संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, SSB च्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.