Indian Army (Photo Credits- PTI)

भारतीय सेनेकडून 10+2 टेक्निकल एन्ट्री स्किमसाठी एक अधिसुचना जाहीर करत नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या नोकरी संदर्भातील अधिक माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तर 10 ऑगस्टपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भौतिक, रसायन विज्ञान आणि गणित विषयासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. सेनेत कायमस्वरुपी नोकरीसाठी काही अटी लागू असणार आहेत. भारतीय सेना टीईएस 44 साठी उमेदवारांना joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

भारतीय सेना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 90 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करणार आहे. उमेदवारांना वरील दिलेल्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर थेट अर्ज करता येणार आहे.  Indian Army TES 44 Recruitment 2020 Notification साठी येथे क्लिक करा.  तसेच उमेदवाराने अर्ज करण्यापुर्वी काही गोष्टींची पुर्तता करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. त्यामुळे या संबंधित माहिती पुढील प्रमाणे:-

>>महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु- 10 ऑगस्ट 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 9 सप्टेंबर 2020

>>TES-44 2020 साठी रिक्त पद

10+2 तांत्रिक प्रवेश योजनेसाठी 90 रिक्त पद (टेंटेटिव)

>>शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10+2 विज्ञान विषय (गणित, भौतिक आणि रसायन विज्ञान) सह कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी मधून एकूण 70 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

>>वयाची अट

TES-44 साठी 16 वर्ष 6 महिने आणि 19 वर्ष 6 महिने अशी वयाची अट आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वात प्रथम इंडियन आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे गेल्यावर देण्यात आलेल्या लिंकच्या मदतीने रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर लॉगिन करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरताना नोकरी संबंधित महत्वाच्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर तो समबिट करुन त्याची प्रिंट जरुर काढा.