ICSI CS Result 2019-20: आयसीएसआय सीएस 2019 प्रोफेशनल प्रोग्रॅम परीक्षेचा निकाल जाहीर; icsi.edu वर ऑनलाईन डाउनलोड करा ई-मार्कशीट
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या, कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल आणि कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयसीएसआय सीएस 2019 परीक्षेला बसलेले विद्यार्थी संस्थेची अधिकृत वेबसाइट, icsi.edu वर दिलेल्या लिंकद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतात.

आयसीएसआयने जुने आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांसाठी सीएस व्यावसायिक निकाल 2019 जाहीर केला आहे. संस्थेने ठरलेल्या वेळेनुसारच हा निकाल जाहीर केला आहे. त्यानंतर आता आयसीएसआय एग्जीक्यूटिव परीक्षा दिसंबर 2019चा निकाल जाहीर करेल.

अधिकृत अधिसूचनेनुसार, एग्जीक्यूटिव परीक्षा दिसंबर 2019-20 निकाल घोषणा आज 25 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 2 वाजता होईल. प्रोफेशनल आणि एग्जीक्यूटिव्ह सीएस परीक्षा डिसेंबर 2019 च्या निकालासह ई-मार्कशीट डाउनलोडसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उमेदवार आपले सत्र, रोल नंबर आणि नोंदणी क्रमांकाद्वारे ते डाउनलोड करू शकतील.

प्रोफेशनल प्रोग्राम (जुना व नवीन अभ्यासक्रम) साठी निकाल जाहीर झाल्यानंतर रिझल्ट-कम-मार्कशीट, लगेचच उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविले जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाल/गुणपत्रकाची प्रत प्राप्त न झाल्यास, उमेदवाराने संस्थेशी संपर्क साधावा. (हेही वाचा: एमएससी बँक मध्ये क्लर्क, जूनियर ऑफिसर पदांसाठी बंपर नोकर भरती; जाणून घ्या पात्रता व इतर माहिती)

असा पहा निकाल -

> आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइटला, icsi.edu ला  भेट द्या

> होमपेजवर, समोर दिसणाऱ्या निकालावर क्लिक करा आणि डिसेंबर 2019 च्या सत्राच्या निकालाच्या माहितीसाठी डाउनलोड ई-मार्कशीटवर क्लिक करा.

> एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे आपल्याला संबंधित सीएस निकालासाठी ई-मार्कशीट डाउनलोड दुव्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर उघडलेल्या नवीन पृष्ठावर आपला कोर्स सिलेक्ट करून इतर माहिती भरा, आपल्याला आपला निकाल दिसेल.