ICAI CA Foundation Result 2023: सीए परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; icai.nic.in वर पहा मार्क्स
CA Result |

ICAI कडून आज CA Foundation Result जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आता आज (7 फेब्रुवारी) जाहीर करणार असल्याचं जाहीर केले आहे. मात्र निकाल कधी जाहीर होणार याची वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. उमेदवार निकाल icai.nic.in या वेबसाईटवर पाहू शकणार आहेत. हा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे.

सीए फाऊंडेशन डिसेंबर 2023 परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. ही परीक्षा 31 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. भारतामध्ये 280 शहरं आणि जगातील 8 शहरांमध्ये या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% मार्क्स प्रत्येक पेपर मध्ये आवश्यक आहे. तर अग्रिग्रेट 50% मार्क्स आवश्यक आहेत. NEET-PG 2024 Exam Date: यंदा नीट पीजी ची परीक्षा 7 जुलै दिवशी; nbe.edu.in वर पहा सविस्तर वेळापत्रक! 

CA Foundation Result December 2023 चा निकाल कसा पहाल?

  • ICAI CA exam results पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट icai.nic.in ला भेट द्या.
  • ICAI Foundation result December 2023 च्या लिंक वर क्लिक करा.
  • आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एंटर करा.
  • त्यानंतर सबमीट वर क्लिक करा.
  • तुमचा सीए फाऊंडेशन 2023 चा निकाल पाहू शकाल.
  • आता तुमचा निकाल डाऊनलोड करण्यासोबतच सेव्ह देखील करून ठेवू शकता.

इथे पहा निकालाची थेट लिंक!

आता सीए फाऊंडेशनच्या पुढल्या सेशन साठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. 23 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकाल. ही परीक्षा यंदा 20, 22, 24, 26 जून दिवशी होणार आहे.