CA Exams 2019: ICAI तर्फे घेण्यात येणाऱ्या CA परीक्षा यंदा नव्या पद्धतीनं होणार,काय बदलणार जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशभरातून दरवर्षी लाखो विद्यार्थी सीए (CA) सीएस (CS) या सारख्या परीक्षा देतात, तरीही यातील केवळ तीन ते चार टक्के इतकेच विद्यार्थी यशस्वी होतात.अनेकदा यासाठी अभ्यासक्रमाचे विस्तीर्ण स्वरूप व प्रश्नांना दोषी धरलं जातं, या चिंतेला लक्षात घेऊन यंदा आयसीएआय (ICAI) तर्फे घेण्यात येणाऱ्या सीए परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. ही नवीन पद्धत यंदा 27 मे ला पार पडणाऱ्या परीक्षेपासून वापरात आणण्यात येईल.

नवीन परीक्षा पद्धतीनुसार इंटरमिडीएट आणि अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमातील पेपर साठी बहुपर्यायी प्रशपत्रिका काढण्यात येतील याकरिता ओएमआर शीटचा वापर करण्यात येणार आहे असेही आयसीएआय परीक्षा मंडळाने सांगितले.आयसीएआयतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या बहुपर्यायी प्रश्नांना 30 टक्के महत्व असून उर्वरित 70 टक्के प्रश्न हे वर्णनात्मक स्वरूपाचे असतील. या बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर देताना हवा तो पर्याय पेन्सिलने डार्क रंगवायचा आहे तर वर्णनात्मक उत्तरे नेहमीच्या मार्गाने सोडवता येतील Maharashtra Board SSC Results 2019: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो 'दहावी'चा निकाल

यंदा सीएच्या परीक्षा 27 मे ला सुरु होऊन 12 जून पर्यंत देशभरातील 144 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये फाउंडेशन कोर्स, इंटरमिडिएट, अंतिम अभ्यासक्रम यांचा जुन्या आणि नवीन कालवधींचा समावेश आहे