GAIL Recruitment 2021: गेल मध्ये सरकारी नोकर भरतीसाठी एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध विभागात एकूण 220 सरकारी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, मेकानिकल, मार्केटिंग, एचाआर, सिव्हिल, राजभाषा सारख्या विभागात मॅनेजर, सिनियर इंजिनियर, सिनियर ऑफिसर आणि ऑफिसर पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गेल (इंडिया) लिमिटेडची अधिकृत वेबसाइट gailonline.com वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 7 जुलै पासून सुरु झाली असून येत्या 5 ऑगस्ट पर्यंत अंतिम तारीख आहे. उमेदवारांना 200 रुपयांचा शुल्क अर्जासाठी भरावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज उमेदवारांना करता येईल. दरम्यान, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्क भरावा लागणार नाही आहे.(AIIMS Recruitment 2021: दिल्लीच्या एम्स मध्ये Senior Consultant, Consultant पदावर होणार नोकरभरती; 15 जुलै पूर्वी becil.com वर असा करा अर्ज)
-या पदांसाठी करता येईल अर्ज
>>मैनेजर (मार्केटिंग-कमोडिटी रिस्क मैनेजमेंट): 4 पद 4
>>मैनेजर (मार्केटिंग इंटरनेशनल एलएनजी आणि शिपिंग): 6 पद
>>सीनियर इंजीनियर (केमिकल): 7 पद
>>सीनियर इंजीनियर (मॅकेनिकल): 51 पद
>>सीनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल): 26 पद
>>सीनियर इंजीनियर (इंस्ट्रुमेंटेशन): 3 पद
>>सीनियर इंजीनियर (सिविल): 15 पद
>>सीनियर इंजीनियर (गेलटेल टीसी/टीएम): 10 पद
>>सीनियर इंजीनियर (बॉयलर ऑपरेशन): 5 पद
>>सीनियर इंजीनियर (पर्यावरण इंजीनियरिंग): 5 पद
>>सीनियर ऑफिसर (ईएंडपी): 3 पद
>>सीनियर ऑफिसर (एफ एंड एस): 10 पद
>>सीनियर ऑफिसर (सी एंड पी): 10 पद
>>सीनियर ऑफिसर (बीआईएस): 9 पद
>>सीनियर ऑफिसर (मार्केटिंग): 8 पद
>>सीनियर ऑफिसर (एचआर): 18 पद
>>सीनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पद 2
>>सीनियर ऑफिसर (लॉ): 4 पद 4
>>सीनियर ऑफिसर (एफ एंड ए): 5 पद
>>ऑफिसर (प्रयोगशाळा): 10 पद
>>ऑफिसर (सिक्युरिटी): 5 पद 5
>>ऑफिसर (राजभाषा): 4 पद
तसेच भारतीय नौसेनेत नोकरीची संधी शोधत असलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्विस कमीशनच्या पदावर लवकरच नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार 45 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 जुलै पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै दिली गेली आहे. त्यामुळे अंतिम तारखेपूर्वीच उमेदवारांनी पदासाठी अर्ज करावा.