
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून 5 मे 2025 दिवशी बारावीचा निकाल (Maharashtra Board HSC Result) जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात 1.49% टक्के निकाल कमी लागला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.88% लागला आहे. या निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालपत्रावर विषयनिहाय गुण, एकूण टक्केवारी दिसली असेल पण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना निकालपत्रावर नापास किंवा FAIL या शेर्याऐवजी Eligible for Re Exam असा शेरा दिलेला दिसेल. अपयशामुळे विद्यार्थी खचू नयेत म्हणून निकालपत्रात हा सन 2020 पासून बदल करण्यात आला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होण्याचा सकारात्मक विचार निकालांमध्ये दिला जात आहे.
Eligible for Re Exam चा अर्थ काय?
राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्ड परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35% गुण आवश्यक आहे. त्यामुळे जे विद्यार्थी एक किंवा त्या पेक्षा अधिक विषयात किमान 35% गुण मिळवू शकत नाहीत त्यांना अनुतीर्ण समजलं जातं. त्यांच्या निकालावर मात्र तसा थेट उल्लेख न करता Eligible for Re Exam असा शेरा दिला जातो. म्हणजे विद्यार्थी त्या विषयाची पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊ शकतात. विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण अस, विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण असल्यास तसेच विद्यार्थी श्रेणीविषयासह एक किंवा दोन विषयांत श्रेणी विषयासह अनुत्तीर्ण असल्यास पुन्हा परीक्षेसाठी पात्र आहेत. नक्की वाचा: MSBSHSE HSC Result 2025: बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्कांची गरज? Grading System कशी घ्या जाणून.
पुरवणी परीक्षेसाठी ७ मेपासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार
बारावीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना 7 मे पासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. श्रेणी सुधारण्यासाठी जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६ या तीन संधी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. हे अर्ज ऑनलाईन करता येणार आहेत. नक्की वाचा: बारावी परीक्षेच्या निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने 6 ते 20 मेदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.