
महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकाल आज (5 मे) जाहीर होणार आहे. आर्ट्स, सायंस, कॉमर्स, व्होकेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना या बारावीच्या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले याची उत्सुकता आज संपणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहाता येणार आहे. mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्स सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर आज विद्यार्थी बारावीचा निकाल पाहू शकतील. तसेच SMS च्या माध्यमातूनही आज बारावीचा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील 9 विभागीय मंडळांमधील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांचा 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज MSBSHSE कडून जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी त्यांच्या हॉलतिकीटावरील रोल नंबर आणि आईचं नाव अचूक टाकावं लागणार आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण आणि एकूण टक्केवारी ऑनलाईन निकालात पाहता येणार आहे. नंतर आठवडाभरामध्ये गुणपत्रिकेची मूळ पत्र विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Board 12th Result 2025: बारावीचा निकाल 1 वाजता जाहीर होणार; पण निकालावर समाधानी नसाल तर गुणपडताळणी, श्रेणी, गुणसुधार, पुरवणी परीक्षेसाठी कसा कराल अर्ज?
बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे?
बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35% गुण आवश्यक आहेत. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा दोन्हींंचे गुण एकत्र केले जातात.
बारावी बोर्ड परीक्षेची ग्रेडिंग सिस्टिम काय असते?
टक्केवारी | ग्रेड |
75% आणि त्यापेक्षा जास्त | Distinction |
60% ते 74% | First Division |
45% ते 59% | Second Division |
35% ते 44% | Pass |
35% पेक्षा कमी | Fail |
कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?
-
- बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.
- सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2025 च्या बारावी परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती .