Bank of Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Bank of Maharashtra Recruitment 2021: बँकेत नोकरी करण्याचा प्रय्तन करतायत. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरल ऑफिसरच्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार 150 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना येत्या 6 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे.(ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये 'या' पदांसाठी नोकर भरती, येत्या 21 एप्रिल पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज)

बँक ऑफ इंडियाच्या नोटीसमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, ही नोकर भरती बँकेतील आवश्यकतेनुसार शाखा मॅनेजर ऑफिसरच्या रुपात देशातीक कोणत्याठी ठिकाणी असणार आहे. तर पोस्टसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/ येथे अर्ज करता येणार आहे. तर जाणून घ्या नोकर भरती संदर्भातील अधिक माहिती. (Sarkari Naukari 2021: महाराष्ट्रासह 'या' 17 राज्यांमध्ये शिक्षक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया)

>>एकूण 150 पद

>एससी -22

>एसटी-11

>ओबीसी- 40

>ईडब्लूएस- 15

>युआर- 62

तर ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2021 आहे. त्यामुळे या तारखेपूर्वी उमेदवारांनी संपूर्ण नोटीस वाचून त्यामध्ये चूक न करता अर्ज भरा. जनरल ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 60 टक्के गुणांसह बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून किंवा बोर्डातून सीए/आयसीडब्लूए/सीएफए/एफआरएम प्रोफेशनल कोर्स केलेला असावा. तसेच कोणत्याही प्रोशेफन बँकेत एका अधिकारी रुपात क्रेडिट भागात, ब्रान्च हेडचा 3 वर्षांचा अनुभव असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षादरम्यान असावे.

तर जनरल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची    निवड आयबीपीएसच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेतील गुणांवरुन केली जाणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवाराला इंटरव्हूसाठी बोलावण्यात येणार आहे.