Dogs Poisoned, Burned in UP Video: गोरखपूर शहरातील एका व्यापाऱ्याने बुधवारी रात्री एका कुत्र्याला आणि तिच्या सात पिल्लांना विष दिले आणि नंतर त्यांचे मृतदेह जाळले. या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीच्या दुकानात एका कुत्र्यानं सात पिल्लांना जन्म दिला. या रागाच्या वृत्तीमुळे त्यांन मुक्या जनावराला विष देवून मारून टाकलं. शुक्रवारी त्यानं असं कृत्य केल्याचं समोर आले आहे. पोलीसांना आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही प्राणी प्रेमींनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे.
गोरखपुर में 6 डॅाग्स को जहर एवं पेट्रोल डाल कर मार डालने वाले व्यापारी के खिलाफ पशु क्रूरता अधिनियम में मुकदमा दर्ज कर कठोर कार्रवाई की जाए @gorakhpurpolice @dgpup @Heritage_fn @CZA_Delhi @peta pic.twitter.com/supbpzTqER
— Rajeev Datt Panday (@DattRajeev) July 19, 2023
गोरखपूर शहरातील एका व्यापाऱ्याने बुधवारी रात्री एका कुत्र्याला आणि तिच्या सात पिल्लांना विष दिले आणि नंतर त्यांचे मृतदेह जाळले. या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोसायटीतील संतप्त रहिवाशांच्या निषेधाची दखल घेत, जिल्हा पोलिस युनिटने गुरुवारी आरोपी व्यापारी, गुरुमुख गंगाराम याच्याविरुद्ध आयपीसी कलम 428 आणि 429 (हत्या, विषप्रयोग, अपंगत्व) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
#gorakhpurpolice#PoliceAction#PsCantt क्षेत्रान्तर्गत स्थित सिनेमा रोड पर सनप्लाजा होटल के सामने श्वान शावको के साथ घटित घटना के संबंध में #spcitygkp द्वारा दी गई वीडियो बाइट-#UPPolice pic.twitter.com/UDYDr9lR9Y
— Gorakhpur Police (@gorakhpurpolice) July 20, 2023
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुमुख गंगाराम एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मोबाईलचे दुकान चालवतात. गेल्या शुक्रवारी याच शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एका कुत्र्याने सात पिल्लांना जन्म दिला होता. यामुळे नाराज झालेल्या गंगारामने त्यांना विषारी बिस्किटे दिली. विषारी बिस्किटे खाल्ल्याने सर्व मुंग्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर गंगारामने त्यांचे मृतदेह पेटवून दिले. मात्र, एका वाटसरूने या कृत्याचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला आणि हे प्रकरण समोर आले. या घटनेबाबत बोलताना कॅन्टचे सर्कल ऑफिसर योगेंद्र सिंग म्हणाले की, पोलिसांनी गंगारामविरुद्ध एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.