Nitin Gadkari (PC -ANI)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सावकरांचे विचार लोकांसमोर मांडलं. 'तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाही.' अशी सूचना दिली. “आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही असेही ते यावेळी म्हणाले.

जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीनं बोलत आहे.” असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. Bandra- Worli Sea link वर नितीन गडकरी यांना सुद्धा भरावा लागला होता दंड, मोदी सरकारच्या 100 दिवसपूर्ती कार्यक्रमात सांगितला किस्सा

आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह पुढे जायचं आहे. मात्र, अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नव्हे, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर पाच हजार वर्षांच्या इतिहासात कधीही कोणत्याही हिंदू राजाने एकही मशीद उद्धवस्त केली नाही. तसेच त्यांनी तलवारीच्या जोरावर कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केलं नाही, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आपली हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचेही ते म्हणाले.