
Delhi Weather Update: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या दिल्लीत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ३८ टक्के नोंदवले गेले. किमान तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्याचे विभागाने सांगितले. IMD ने दुपारी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
विभागाच्या म्हणण्यानुसार, आज गडगडाटी वादळ, धुळीचे वादळ आणि तुरळक पाऊस किंवा रिमझिम पावसासह ताशी 25 ते 35 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.