Delhi Murder: दारूची तलब भागवण्यासाठी 45 वर्षीय व्यक्तीची केली हत्या, दिल्ली येथील 3 अल्पवयीन मुलांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

दारूची तलब भागवण्यासाठी 45 वर्षीय व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिल्लीच्या (Delhi) सुलतानपुरी (Sutanpuri) भागात शुक्रवारी (25 जून) घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 3 अल्पवयीन मुलांनी ही हत्या केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) तिघांनाही अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र कुमार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविंद्र कुमार हे कंत्राटदार म्हणून काम करत असून नांगलोई येथील रहिवाशी होते. तर, तिन्ही आरोपींचे वय 17 वर्षे असून ते एका दुकानात काम करतात. याचदरम्यान, या तिघांनाही दारूचे व्यसन लागले. दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी लुटमार सुरू केली. दरम्यान, दविंद्र शुक्रवारी सलतानपुरी येथील जलेबी चौकाजवळील पार्कजवळ फोनवर बोलत होता. त्यावेळी आरोपीं मुलांपैकी एकाने रविंद्रच्या मानेला धरले आणि दुसऱ्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविंद्र आणि त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. त्याचवेळी तिसऱ्या मुलाने त्याच्याजवळील चाकू काढून रविंद्रवर हल्ला केला.त्यानंतर त्यांनी त्याच्या पाकिटातून पैसे काढून पळ काढला. हे देखील वाचा- Bank of Baroda: मास्क घातला नाही म्हणून ग्राहकाला झाडली गोळी, बॅंक ऑफ बडोदाच्या सुरक्षा रक्षकाला अटक

डीसीपी परविंदर सिंह म्हणाले की, शनिवारी संजय गांधी रुग्णालयाकडून आम्हाला माहिती मिळाली की, जलेबी चौकातून जखमी अवस्थेत आढळलेल्या रवींद्र नावाच्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतर राज पार्क पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपींची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळाजवळील डिजिटल पुरावे गोळा केले. त्याआधारे याप्रकरणातील आरोपी 3 अल्पवयीन मुलांना पकडण्यात पोलिसांना यश आले. चौकशीदरम्यान, त्याने आपला गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यात वापरलेला चाकू, मृतांचे आधार कार्ड असलेले पाकीट, आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे आणि 700 रुपये रोकड जप्त केली आहे.