Delhi Murder: खळबळजनक! बंजरग दलाच्या कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या; दिल्लीतील मंगोलीपुरी येथील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बजरंग दलाच्या (Bajrang Dal) एका कार्यकर्त्यांची घरात घसून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिल्लीतील (Delhi) मंगोलीपुरी (Mangolpuri) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात दैनिक जागरणने वृत्त दिले आहे.

रिंकू शर्मा असे हत्या झालेल्या तरूणाच नाव आहे. रिंकू हा टेक्निशियन असून पश्चिम विहारमधील एका रुग्णालयात काम करत होता. याशिवाय, तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, बुधवारी उशीरा रात्री काहीजणांनी रिंकूचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर दार उघडतास आरोपी जबरदस्तीने घरात घुसले आणि रिंकूवर चाकूने हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. रिंकूला त्याच्या नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा-  Uttar Pradesh मधील धक्कादायक घटना; बिछाना खराब केला म्हणून चुलतीने केली 5 वर्षांच्या पुतण्याची हत्या; वडिलांच्या मदतीने मृतदेह पुरला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून रिंकूची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर रिंकूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत.