कोरोना महामारीच्या काळात देशात फसवणूकीच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच दिल्लीच्या (Delhi) सीआर पार्कमध्ये (CR Park) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रेयसीसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका तरूणाकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पाहून प्रियकराला मोठा धक्का बसला आहे. आरोपी व्यक्ती दुसरी तिसरी नसून फिर्यादी तरूणाचा मित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबरला फिर्यादी तरूणाच्या घरी लेटर आणि पेन ड्राईव्ह सोडण्यात आले होते. तुझे प्रेयसीसोबतचे काही अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहेत. जर तू दहा लाख रुपये नाही दिले तर, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जाईल, अशी धमकी संबंधित तरूणाला देण्यात आली होती. त्यानंतर या तरूणाने पोलिसांत धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तिविरोधात जाळे टाकून त्याला अटक केली आहे. हे देखील वाचा- Haryana: देशभरात आपल्या विर्यासाठी लोकप्रिय असणाऱ्या Sultan चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 21 कोरी रुपयांची लागली होती बोली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर हा सर्वप्रिय विहार येथील रहिवाशी असून दिल्लीच्या गुडगावमधील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आरोपी हा दुसरा तिसरा नसून फिर्यादी व्यक्तीचा मित्र आहे. यानंतर संबंधित व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात माहिती दिली आहे.