Haryana: वीर्य विक्रीतून व्हायची लाखो रुपयांची कमाई; 21 कोटी रुपयांची बोली लागलेल्या Sultan चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हरियाणातील (Haryana) कैथल जिल्ह्यात एक रेडा होता ज्याचा थाट आणि शौक अगदी नवाबी होता. या रेड्याचे नाव सुलतान (Sultan) असे होते. सुलतानने हरियानाचे नाव देशातच नाही जगभरात ‘रोशन’ केले होते

Haryana: वीर्य विक्रीतून व्हायची लाखो रुपयांची कमाई; 21 कोटी रुपयांची बोली लागलेल्या Sultan चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सुलतानचा मृत्यू (संग्रहित संपादित प्रतिमा)

हरियाणातील (Haryana) कैथल जिल्ह्यात एक रेडा होता ज्याचा थाट आणि शौक अगदी नवाबी होता. या रेड्याचे नाव सुलतान (Sultan) असे होते. सुलतानने हरियानाचे नाव देशातच नाही जगभरात ‘रोशन’ केले होते. या सुलतानचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुलतानच्या माध्यमातून त्याचा मालक नरेश बेनीवाल लाखो रुपयांची कमाई करत होता. नरेश बेनीवाल म्हणाले की, सुलतानसारखा कोणीही नव्हता आणि कदाचित पुढेही कोणीही नसेल. सुलतानमुळेच बेनीवाल यांना एक विशेष ओळख मिळाली होती.

सुलतानच्या जाण्याचे दुःख इतके मोठे आहे की, हरियानाच्या विविध भागातून लोक बेनीवाल यांना भेटायला येत आहेत. सुलतानचे महत्व आणि त्याची किंमत यासाठी जास्त होती कारण, त्याचे वीर्य देशभरात लाखो रुपयांना विकले जात होते. सुलतान हजारो वीर्याचे डोस देत होता, जे प्रति डोस 300 रुपयांना विकले जायचे. अशाप्रकारे त्याचा मालक वर्षाला साधारण 90 लाख रुपये कमवायचा. 2013 मध्ये झज्जर, कर्नाल आणि हिसार येथे झालेल्या राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत सुलतान राष्ट्रीय विजेता ठरला होता.

प्रदर्शनादरम्यान, सुलतान अनेकांचे लक्ष वेधून घ्यायचा. एका प्रदर्शनामध्ये सुलतानसाठी तब्बल 21 कोटी रुपयांची बोली लागली होती, मात्र त्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला. सुलतानच्या मालकाचे सुलतानवर त्याच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम होते. आता मालक नरेश त्याच्या जाण्याने खूप दु:खी झाला आहे. वयाच्या 14 व्या वर्षी सुलतानचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (हेही वाचा: अबब! 15 कोटी रुपयांहूनही महाग आहे हा रेडा; 6 फूट उंच तर, 14 फूट लांब, वजन फक्त 1300 किलो)

दरम्यान, सुलतान अतिशय लक्झरी जीवन जगला होता. सुलतान दररोज दहा किलो दूध प्यायचा आणि सुमारे 15 किलो सफरचंद खात असे. हिवाळ्यात तो रोज दहा किलो गाजर खात असे. याशिवाय त्याच्यासाठी ड्राय फ्रूट्स आणि इतर प्रकारची उत्पादने खास तयार केली जात होती. त्याच्यासाठी केळी आणि तुपाचा डोस वेगळा दिला जायचा. सुलतानचा दैनंदिन खर्च 2000 पेक्षा जास्त होता. कधी कधी तर तो 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत जायचा.

(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2021 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).