दिल्लीत पंख्याच्या कारखान्यात स्फोट, मृतांचा आकडा 7 वर पोहचला
दिल्ली कम्प्रेसर स्फोट (फोटो सौजन्य-ANI)

नवी दिल्ली येथील मोतीनगरमध्ये सुदर्शन पार्कमध्ये पंख्यांच्या कारखान्यात गुरुवारी रात्री अचानक स्फोट झाला. त्यामुळे कारखान्याच्या इमारतीचा काही भाग पूर्ण खाली कोसळून पडला. या प्रकरणी कारखान्यातील कर्मचारी जखमी झाले असून अन्य कर्माचाऱ्यांचे बचाव कार्य सुरु आहे.

गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुदर्शन पार्कमध्ये असलेल्या पंख्याच्या कारखान्यातील तिसऱ्या मजल्यावर कम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारतीचे दोन मजले खाली कोसळून पडले. त्यावेळी कारखान्याच्या या मजल्यावर 20 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत होते. या घटनेची दखल घेत अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून बचाव कार्य सुरु केले. परंतु अजूनही काही कर्मचारी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले असून आता पर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच जखमी कर्मचाऱ्यांवर जवळच्या रुग्णलयात उपचार चालू आहेत.