Rahul Gandhi & Abhijeet Banerjee (File Image)

काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाचे अमेरिकास्थीत अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी (Abhijeet Banerjee) अर्थशास्त्राचा नोबल (Noble) जाहीर झाला आणि संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेछयांचा वर्षाव झाला. परंतु केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी त्यांना 'डाव्या विचारसरणीचे' असे संबोधत 'बॅनर्जी यांच्या मूलभूत उत्पन्न योजनेला भारतीय जनतेने झिडकारले असून ते काय विचार करतात हे महत्वाचं नाही', असे प्रतिपादन केले होते. यावर बॅनर्जी यांनी उत्तर देताना 'केंद्रीय मंत्र्यांनी माझ्या क्षमतेवरच शंका घेतलेली आहे' असे म्हटले होते.

आता या वादावर राहुल गांधींनी आपलं मत मांडलं आहे. राहुल गांधी आपल्या ट्विटर वर म्हणतात,'बॅनर्जी, हे कट्टरपंथी लोकं द्वेषाने आंधळे झाले आहेत. एक तज्ज्ञ काय असतो याची त्यांना कल्पनाच नाही. तुम्ही एक दशक जरी यांना समजावण्याचा प्रयत्न केलात ना तरीही त्यांना नाही कळणार. पण तुम्ही करत असलेल्या कार्याचा लाखो भारतीयांना प्रचंड अभिमान आहे.'

पाहा ट्विट:

 

(हेही वाचा. Abhijeet Banerjee यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं; Microsoft च्या Bill Gates यांचे कौतुकोद्गार)

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अभिजीत बॅनर्जी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस सोबत मिळून NYAY म्हणजेच 'न्यूनतम आय' योजनेवर काम केले होते. पण अभिजीत बॅनर्जी यांनी पियुष गोयल यांना प्रत्युत्तर देताना 'मी सरकारधार्जिणा नाही. गोयलांनी जरा एकदा माझया पूर्वीच्या कार्यावर नजर टाकावी मग त्यांना कळेल की मी आधीच्या युपीए सरकारवरसुद्धा कडक शब्दात टीका केलेली आहे' असे वक्तव्य केले होते.