Naxals यांनी हल्ला करण्यासाठी लढवली नवी शक्कल, उभे केले खोटे पुतळे
नक्षलवादी हल्ला (फोटो सौजन्य-ANI)

Chhattisgarh:छत्तीसगड येथे सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यासाठी नक्षसवाद्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. या करिता नक्षलवाद्यांनी जंगलात पुतळे उभे केले असून ते जीवंत नक्षलवादी आहेत असे जवानांना भासवून दिले होते.

सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा येथील जंगलात नक्षलवाद्यांनी हातात लाकडी शस्रे असलेली तीन बुजागणे उभे केले होते. तसेच या बुजगावण्याच्या आतील बाजून त्यांनी शक्तीशाली स्फोटके लपविली होती. तर या स्फोटकयुक्त बुजगावण्यांना जरासा ही धक्का लागल्यास भीषण स्फोट होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या या भीषण स्फोटाचा कट सीआरपीएफ जवांनांनी आधिच उधळला आहे.

नक्षलवाद्यांनी प्रथमच हल्ला करण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे सीआरपीफच्या 150 बटालीय कमांडर डी यांनी दिली आहे.