भाजप महिला खासदारांच्या मागणीला राहुल गांधी यांचा नकार; माफी मागणार नसल्याचे केले स्पष्ट
Congress President Rahul Gandhi (File Photo)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी झारखंडमधील (Jharkhand) एका सभेत रेप इन इंडिया असे वक्तव्य केले होते. यावर भाजपच्या महिला खासदारांनी आक्षेप नोंदवला आहे. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला असून याप्रकरणी त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु, राहुल गांधी यांनी या मागणीला स्पष्ट नकार दिला असून मी माफी मागणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भारत पेटवला आहे. या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मला लक्ष्य केले जात आहे. असेही राहुल गांधी त्यावेळी म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया आता रेप इन इंडिया झाला आहे, अशा वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. यामुळे लोकसभेत जोरदार गदारोळ झाला होता. राहुल गांधी यांनी चुकीचे विधान केले आहे, हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत भाजपच्या अनेक महिला खासदारांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी लोकसभेत केली आहे. यावर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. माफी मागण्याचा प्रश्नच नाही. मी या मुद्यावरुन कोणाचीही माफी मागणार नाही. महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी दिल्लीला रेप कॅपिटल असे म्हटले होते. मी माझ्या वक्तव्याचा पुनरुच्चार करतो. नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया म्हटले होते. आम्हाला वाटले की वृत्तपत्रामध्ये मेक इन इंडिया दिसेल. पण आज वृतपत्र पाहिली तर प्रत्येक ठिकाणी रेप इन इंडिया दिसते. हे देखील वाचा- नागरिकत्व दुरुस्ती कायदा अस्तित्त्वात; केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्र्यांनी दर्शवला विरोध

राहुल गांधी यांचे ट्वीट-

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लागू झाल्यानंतर ईशान्य भारतात वाद चिघळायला सुरुवात झाली आहे. याला केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार आहेत. या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी मला लक्ष्य केले जाते आहे. ज्यामुळे लोकांचे ईशान्य भारतात सुरु असलेल्या वादाकडे दुर्लक्ष होईल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.