माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्या निधनाची बातमी सांगत काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी एक ट्विट केलं आहे. यानंतर सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली. मात्र, भाजप नेते कैलास विजय वर्गीय यांनी सुमित्रा महाजन स्वस्थ असल्याचे ट्विट करून ही बातमी चूकीची असल्याचं सांगितलं आहे. कैलास वर्गीया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'ताई निरोगी आहेत, देव त्यांना आशीर्वाद देवो.'
कैलास विजय वर्गीय यांच्या ट्विटनंतर शशी थरूर यांनी आपल्या ट्विटला प्रत्युत्तर देताना सांगितले की, आपण ते ट्विट डिलीट केले आहे. शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये सुमित्रा महाजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटलं होतं की, सुमित्रा महाजन आणि दिवंगत सुषमा स्वराज यांनी जेव्हा त्यांना 'ब्रिक्स' च्या भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले, ते क्षण नेहमी आठवणीत राहतील. सध्या शशी थरूर यांनी आपले ट्विट डिलीट केले आहे. (वाचा -Coronavirus in India: कोरोना व्हायरस विरोधात देशाच्या लढाईमध्ये Ravichandran Ashwin ने सुरु केले ‘हे’ चांगले काम, अशाप्रकारे करणार COVID-19 रुग्णांची मदत)
I am relieved if that is so. I received this from what I thought was a reliable source: “पूर्व लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन जी हमारे बीच नहीं रहीं.
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें.🙏” Happy to retract & appalled that anyone would make up such news. https://t.co/3c8pDGaBRv
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
सुमित्रा महाजन यांचा कोविड अहवाल नकारात्मक आला होता. त्याच्या प्रकृतीतही सुधार झाल्याची माहिती दिली जात आहे. प्राप्त माहितीनुसार त्याला हलका ताप आला. सुमित्रा महाजन यांच्या केवळ शशी थरूर यांनीचं नव्हे, तर कॉंग्रेस नेते अल्का लांबा यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. जे ट्विट आता अल्का लांबानेही हटवले आहे.