Bharat Bachao Rally: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर टिकेचा वर्षाव
Rahul Gandhi And Narendra Modi (Photo Credits-Twitter)

नुकतीच काँग्रेसचे (Congress) पक्षाकडून भारत बचाव रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. यातच काँग्रेस पक्षाने दिल्ली (Delhi) येथील रामलीला मैदानावर (Ramleela Maidan) सभा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारताची सध्याची परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी महत्वाचे मुद्दे मांडत सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशावर संकट निर्माण झाले आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण देशाला फटका बसत आहे. महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अनेक अश्वासनाचे काय झाले? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी त्याठिकाणी उपस्थित केला आहे.

नुकतीच काँग्रेस पक्षाची पार पडलेल्या भारत बचाव रॅलीत पक्षाचे नेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी अनेक महत्वाचे विषय जनतेसमोर मांडले आहेत. गेल्या काहीदिवसापूर्वी राहुल गांधी यांनी झारखंड येथील सभेत मेक इन इंडियाच्या बदल्यात रेप इन इंडिया असे वक्तव केले होते. या वक्तव्याचे राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या अनेक महिला खारदारांनी शुक्रावारी लोकसभेत केली होती. मात्र, मी मरेल,परंतु माफी मागणार नाही. जर माफी मागायची असेल तर ती नरेंद्र मोदी यांनी मागावी असे राहुल गांधी म्हणाले आहेत. हे देखील वाचा-भाजप महिला खासदारांच्या मागणीला राहुल गांधी यांचा नकार; माफी मागणार नसल्याचे केले स्पष्ट

नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे, असे बोलत राहुल गांधी यांनी नोदबंदी हा विषयदेखील मांडला. काहीवर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन देशाला अडचणीत टाकले आहे. त्यांनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णायामुळे देशात मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढली आहे. देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील भ्रष्टाचार कमी झाले का? काळ्या पैशाच्या विरोधात लढाचये असे त्यांनी खोटे सांगितले होते. तर, नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर करुन त्यांनी ईशान्य भारत देखील पेटवला असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.

एएनआयचे ट्वीट-

शेतकरी आणि कामगारांशिवाय देशाचा विकास होणे अशक्य आहे. याकडे मोदी सरकार दुर्लक्ष करीत आहे. नरेंद्र मोदी केवळ पक्षाच्या मार्केटींगवर भर देत आहे. टी.व्हीवर ज्या जाहिराती दाखवतात त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. यासाठी नरेंद्र मोदी लाखो रुपये खर्च करतात. तसेच दिवसभरात नरेंद्र मोदी अनेकदा टि.व्हीवर पाहायला मिळतात, असे बोलून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या जोरदार टिका केली आहे.