भारतात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्ली येथेही गेल्या अनेक दिवासांपासून पावसाच्या सततधारा सुरू आहे. यातच मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थान असलेल्या एका खोलीचे छत कोळसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संकट काळात अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून या खोलीत अनेक बैठका घेतल्या होत्या. मात्र, ज्यावेळी या खोलीच्या छताचा भाग कोसळला तेव्हा तिथे कोणीही नव्हते, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या घटनेची माहिती होताच अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळाले आहे. तसेच ही घटना समजताच दिल्लीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाला भेट दिली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यासाठी हे निवासस्थान 1942 मध्ये बांधण्यात आले होते. परंतु, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या निवासस्थानात राहत नव्हत्या. शीला दीक्षित या मोतीलाल नेहरु मार्गावर असलेल्या त्यांच्या निवासस्थानी वास्तव्य करत होत्या. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर अरविंद केजरीवाल 2015 साली या ठिकाणी राहायला आले होते. याआधी अरविंद केजरीवाल एका थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहायला होते. मात्र, दिल्लीत सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे या निवासस्थानातील छताचा भाग कोसळला आहे, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेस आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक: दिल्लीत 13 वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; कात्रीने वार करून खुनाचा प्रयत्न; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली पिडीतेची भेट
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. तर, काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच काही परिसरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.