Representational Image (Photo Credits: PTI)

भारतात मागील वर्षापासून कोरोनाचे संकट वावरत आहे. नुकतीच देशात कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे. याचपार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईच्या (ICSE) दहावीच्या (10th Exams) परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर बारावीच्या परिक्षादेखील (12th Exams) रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच जर आयआयटी (IIT)-जेईई (JEE) किंवा सीएलएटीसारख्या (CLAT) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न याचिकेद्वारे विचारण्यात आला होता. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे

दरम्यान, बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अंशुल गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश मागहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हे देखील वाचा- CRPF Recruitment 2021: फिजियोथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती

ट्वीट-

कोरोना महामारीने सर्वांचेच आयुष्य बदलून टाकले आहे. या काळात व्यवसाय, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द किंवा निर्बंधाखाली पार पाडाव्या लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनाची दुसरी थोपवली असताना देशासमोर तिसऱ्या लाटेचा धोका घोंगावत असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यामुळे सरकारकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.