Bus Stuck PC X

Gujarat: गुजरात येथील भावनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात तामिळनाडूच्या प्रवाशांना घेऊन जाणारी बस अडकली आहे. बसमध्ये एकून ५५ प्रवाशी प्रवास करत होते. पर्यटकांना घेऊन जाणारी बस पूरात अडकल्याची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झाले आणि शुक्रवारी पहाटे सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. (हेही वाचा- नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटकांना घेऊन जाणारी ही बस गुरुवारी संध्याकाळी कोलियाक गावाजवळील ओढ्यावरील मार्गावरील पूराच्या पाण्यात अडकली. गेल्या काही दिवसांपासून भावनगर येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे कॉजवे पाण्याखाली गेला होता. तरीही बस चालकाने बस पुढे नेण्याचा धाडस केला आणि पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली.

व्हिडिओ

अधिकारी बचावकार्य टीमसह घटनास्थळी

पूराच्या पाण्यात पर्यटक बस अडकल्याची माहिती बचावकार्याला देण्यात आली. बस अडकल्यानंतर बचावकार्य सुरु झाले. बचाव कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी ट्रक पाठवला. प्रवाशांना बसच्या खिडकीतून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ट्रकमध्ये हलवण्यात आले.  बसमधून बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांना घेऊन जाणारा ट्रक देखील पूरात अडकला होता. आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे तीनच्या सुमारास सर्व यात्रेकरंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.