Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने खाजगी बसला जोरदार धडक दिल्याने बस अपघात स्थळाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन धडकली. ट्रक चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत असताना बसला धडक दिली.

Nagpur Accident: नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार, 20 जण जखमी
Photo Credit- X

Nagpur Accident: नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर-भिवापूर मार्गावर भीषण अपघात झाला. बसची ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने खाजगी बसला जोरदार धडक दिल्याने बस अपघात स्थळाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन धडकली. ट्रक चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत असताना बसला धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक एवढी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा निष्काळजीपणा आणि भरधाव वेग यामुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. धडकेनंतर ट्रकही पलटी झाला. त्यानंतर जेसीबी मागवून दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस मृतांची ओळख पटवत आहेत. (हेही वाचा - Raichur School Bus Accident: रायचूरमध्ये सरकारी बसची शाळेच्या बसला धडक; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी)

नागपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत 4 ठार - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 8255 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).